मनोरंजन

आदिनाथ कोठारे- रणवीर सिंह झळकला बुर्ज खलिफावर

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या कारकिर्दीत यशाची अनेक शिखर पादाक्रांत केली आहेत. २०२१ हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करिअरच्या दृष्टीने तर अविस्मरणीय वर्ष ठरलं असं म्हणावं लागेल. यंदा आदिनाथला 'पाणी' चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात 'सिटी ऑफ ड्रिम्स' वेबसीरिजव्दारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला.

मराठी सिनेसृष्टीत गेली काही वर्ष यशस्वी करिअर करत असलेल्या आदिनाथ कोठरेचा २४ डिसेंबर २०२१ रोजी येणाऱ्या ८३' चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण करत आहे. कबीर खान दिग्दर्शित '८३' चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ आपला अभिनयाचा ठसा उमटवताना दिसणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला. आदिनाथ कोठारे पहिला मराठी अभिनेता-दिग्दर्शक आहे, ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे. यामुळे आदिनाथच्या चाहत्यामध्ये आनंदात वातावरण पसरले आहे.

याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आदिनाथ म्हणतो की, 'मी आत्ता खूप भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. '८३' चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला आणि चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे.'

रणवीर सिंहही झळकला बुर्ज खलिफावर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने या चित्रपटात मुख्य भूमिका साकरल्या आहेत. '८३' चित्रपटात रणवीरने कपिल देव आणि दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया हिची भूमिका साकारली आहे. आदिनाथ कोठारेसोबत दुबईच्या बुर्ज खलिफावर रणवीर सिंहदेखील झळकला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी '८३' चित्रपटाची टिम दुबईत पोहोचली होती. बुर्ज खलिफावर रणवीरला पाहून दीपिका मात्र, अवाक नजरेने एकटक पाहतच राहिली.

या चित्रपटाचे दिग्दर्शिन कबीर खान तर निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केले आहे. '८३' हा चित्रपट १९८३ चा विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT