Adah Sharma Marathi debut pudhari photo
मनोरंजन

Adah Sharma Marathi debut | ‘द केरल स्टोरी’ फेम अदा शर्मा मराठी चित्रपटात करतेय डेब्यू, पहिले पोस्टर रिलीज

श्रेयस जाधव दिग्दर्शित, अमोल बोरकर निर्मित ‘गजरा’ नवीन वर्षात भेटीला येणार

स्वालिया न. शिकलगार

Adah Sharma GAJRA debut in Marathi 

'झिगझॅग प्रॉडक्शन' आणि 'गणराज स्टुडिओज' यांनी आपल्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'गजरा' असे या चित्रपटाचे नाव असून, नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा झळकणार आहे. द केरल स्टोरीमुळे चर्चेत आलेल्या अदाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

पोस्टरमध्ये काय?

पोस्टरमध्ये अदा शर्माचा अत्यंत रौद्र, भीतीदायक आणि रक्ताने माखलेला चेहरा दाखवण्यात आला आहे. तिच्या डोळ्यांमधील तीव्र भाव, कपाळावर लावलेले कुंकू आणि नाकातील पारंपरिक नथ हा लूक लक्षवेधी ठरतो आहे. 'गजरा'ची कथा समाजातील सत्य घटनांवर आधारित आहे. एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर प्रकाश टाकणारी कथा असेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्रेयस जाधव करत आहेत. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस जाधव यांचा हा चौथा चित्रपट असेल. देवदत्त मनीषा यांचे संगीत असून निर्मिती अमोल बोरकर यांनी केली आहे.

जेव्हा 'गजरा' या चित्रपटाची मूळ संकल्पना आणि यामागील सत्य घटना माझ्यासमोर अमोल बोरकर जी यांनी आणली , तेव्हाच मला जाणीव झाली होती की हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसेल, तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरेल. ही एक अतिशय तीव्र, संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी कथा असेल सध्या एवढेच सांगेल.
श्रेयस जाधव, दिग्दर्शक

अदाची या मराठी चित्रपटासाठी निवड कशी झाली?

श्रेयस जाधव म्हणाले, या भूमिकेसाठी आम्हाला एका अशा चेहऱ्याची गरज होती जो निरागसता आणि तितकाच रौद्र अवतार एकाच वेळी पडद्यावर जिवंत करू शकेल. अभिनेत्री अदा शर्माच या भूमिकेसाठी उत्तम न्याय देईल, असे वाटले. मी आणि अमोल यांनी ठरवले की, अदा शर्माच ही भूमिका साकारेल. पोस्टरमध्ये तिची जी झलक दिसत आहे, ती तर फक्त एक सुरुवात आहे. चित्रपटात तिचा एक वेगळाच अभिनय पॅटर्न प्रेक्षकांना पाहायला मिळेल." मराठी चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अदा शर्माचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT