Aami Dakini Ghost new Show  Instagram
मनोरंजन

Aami Dakini Ghost Show | 'आहट'च्या थरारानंतर येतेय 'आमी डाकिनी'; सौंदर्य आणि मृत्यूचा शाप!

Sheen Dass Aami Dakini Ghost Show | ‘आमी डाकिनी’ येतेय काळजाचा ठोका चुकवायला! थरार, रहस्य आणि मोहिनीचा नवा खेळ

स्वालिया न. शिकलगार

Actress Sheen Dass Aami Dakini Ghost Show

मुंबई - ‘आहट’सारख्या गाजलेल्या शोने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर एक नवीन थरारक प्रवास – ‘आमी डाकिनी’ येतोय. 'आमी डाकिनी' ही एक अशी प्रेमकथा आहे जी काळाच्या आणि जन्मांच्या मर्यादा ओलांडते. डाकिनीला तिचं हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवायचं आहे. पूर्वजन्मातलं तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी ती परत येते – काळाच्या पार, मृत्यूच्या पलिकडून. बाहेरच्या जगाला ती भूतकाळाची एक सावली वाटेल, पण तिच्यासाठी हा पुनर्जन्म म्हणजे अपूर्ण राहिलेलं प्रेम पूर्ण करण्याचा प्रयत्न.

या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे डाकिनी – मोहक, रहस्यमय आणि ठाम. आपल्या हरवलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. तिचं प्रेम आणि तिची आसक्ती यामधली सीमारेषा हळूहळू अस्पष्ट होऊ लागते. सौंदर्य आणि संहार यामध्ये फरकच उरत नाही. तिच्या मार्गात येणाऱ्याला जगणंही नशिबात नसेल.

शीन दास या प्रतिभावान अभिनेत्रीने डाकिनीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक भूमिका ठरणार आहे. डाकिनीविषयी बोलताना शीन म्हणते, “ही भूमिका माझ्यासाठी पूर्णतः वेगळी आणि गूढ आहे. डाकिनी ही एक तीव्र भावभावनांनी भरलेली व्यक्तिरेखा आहे – शक्तिशाली, निर्भय आणि कुणाचीही पर्वा न करणारी. तिला साकारताना अनेक भावनिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावं लागलं. कधी धडकी भरवणारे क्षण होते, कधी अंतर्मनात खोल उतरावे लागले. प्रेक्षक तिच्या अप्रत्याशित स्वभावाने आणि तिने निर्माण केलेल्या गूढ, धक्कादायक जगात नक्कीच हरवून जातील. ही मालिका म्हणजे एक भावनिक आणि थरारक झेप आहे.”

‘आमी डाकिनी’ २३ जूनपासून सोमवार ते शुक्रवार, रात्री ८ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोवी लिव्ह टीव्हीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT