मनोरंजन

Sharmin Segal : ‘हिरामंडी’साठी मामा भन्साळींनी ‘आलमजेब’ ला दिली तगडी रक्कम

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही वेबसिरीज १ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेबसीरीजला रिलीज होवून आता तिसरा आठ‍वडा असून ती ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या वेबसीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल या स्टार्संनी दर्जेदार अभिनय साकारलाय. मात्र, ही वेबसीरीज पाहून संजय भन्साळी यांची भाची शर्मीन सहगलला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तिच्या 'हिरामंडी'साठी घेतलेल्या मानधनावर बोलले जात आहे.

शर्मीन सहगलविषयी 'हे' माहिती आहे काय?

  • शर्मीन सहगलचे मामा संजय लीला भन्साळी यांनी तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली.
  • शर्मीनने 'मलाल' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं आहे.
  • शर्मीनला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले.

संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये 'आलमजेब' ची भूमिका साकारणारी शर्मीन सहगल तिच्या अभिनयामुळे ट्रोल होत आहे. धमाकेदार या बेवसीरीजमध्ये शर्मीन इतर अभिनेत्रींप्रमाणे भारदस्त अभिनय साकारू शकली नाही. तिचे फक्त जास्त करून हावभाव यात दिसले आहेत, मात्र, इतर बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत ते कमीच आहेच. असे असूनही मामा संजय भन्साळी यांनी आपल्या भाची शर्मीनला या कास्टसाठी मोठी रक्कम कशी काय दिली? यावरून तिला जास्त करून ट्रोल केलं जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.

मामा संजय भन्साळींनी भाचीला दिली मोठी रक्कम

अभिनेत्री शर्मीनने तिच्या फिल्मी करिअरमध्ये मोजकेच चित्रपट साईन केलं आहेत. मात्र,फिल्मी जगतात तिची करिअर कमी असूनही तिला ३५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम कशी काय देण्यात आली? यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीवरून, शर्मीनला 'हिरामंडी'साठी मामा संजय भन्साळींनी ३५ लाख रूपये दिल्याची माहिती मिळतेय. ही रक्कम मुख्य अभिनेत्री संजीदा शेख हिच्यापेक्षा केवळ ५ लाख रुपयांनी कमी आहे. तर अनेक वर्षांच्या अनुभवानंतर संजीदाला ४० लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. या वेबसीरीजमध्ये संजीदाने 'वहिदा' ची मुख्य भूमिका साकारलीय.

इतर अभिनेत्रींना मिळाली रक्कम

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मीन आणि संजीदासोबत सोनाक्षी सिन्हाला २ कोटी रुपये, मनीषा कोईरालाला १ कोटी रुपये, रिचा चड्ढाला १ कोटी रुपये आणि आदिती राव हैदरीला १ ते दिड कोटी रुपये फी दिली आहे. या वेबसीरीजचे एकूण बजेट २०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

शर्मीनची कारकीर्द ठरली फ्लॉप

शर्मीन सहगलने २०१९ मध्ये 'मलाल' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. या चित्रपटात शर्मीनसोबत अभिनेता मिझान जाफरी होता. विशेष म्हणजे, संजय लीला भन्साळी स्वत: आपल्या भाचीचे करिअर चित्रपटांमध्ये करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शर्मीनच्या पहिल्या चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली होती. मात्र, त्यानंतर शर्मीन काही खास करू शकली नाही. म्हणूनच त्यांनी 'हिरामंडी'साठी तिला घेवून चांगली फी दिल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT