actress Saba Khan marriage
मुंबई - अभिनेत्री सबा खानने रिॲलिटी शो 'बिग बॉस १२' मधून प्रसिद्ध झाली होती. तिन आफल्या लग्नाचे (निकाह) फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने आपल्या लग्नाबद्दलची माहिती फॅन्ससोबत शेअर केलीय. शिवाय एक भावूक मॅसेज देखील लिहिलाय.
अभिनेत्रीने सबा खानने एका बिझनेस मॅन वसीम नवाबशी जोधपूरमध्ये निकाह केला. निकाहचे फोटोदेखील तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिने कॅप्शनमध्ये सबा खानने लिहिलंय, मन तयार होईपर्यंत काही मागणे आपोआप पूर्ण होतात.. आज, पूर्ण आत्मविश्वासाने, मी माझ्या लग्नाचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करते. बिग बॉसमध्ये तुम्ही ज्या मुलीला पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले आणि प्रेम केले ती मुलगी आता आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू करत आहे. निकाहचा हा पवित्र प्रवास सुरू करताना मी तुमच्या आशीर्वादांची वाट पाहत आहे.'
युजर्सनीदेखील सबा खानच्या लग्नाच्या फोटोंवर अभिनंदनाचे संदेश लिहिले आहेत. सबाचे फॅन्स देखील तिच्या लग्नाचे फोटो पाहून आनंदित दिसत आहेत.
'बिग बॉस १२' मध्ये सबा खान आणि सोमी खान या दोन्ही बहिणी दिसल्या होत्या. सोमीने राखी सावंतचा एक्स पती आदिल दुर्रानीशी लग्न केलं तर आता मोठी बहिण सबाने देखील जोधपूरचा बिझनेसमॅन वसीम नवाबशी निकाह केला. सबाने आपल्या फॅमिली आणि जवळच्या उपस्थितांमध्ये लग्न केले.
सबा खान जोधपूरच्या एका नवाब परिवाराची सून बनलीय. तिचा पती वसीम जोधपूरच्या एका नवाब परिवाराशी संबंधित आहे. सबाच्या लग्नात आदिल दुर्रानी देखील उपस्थित होता. यावेळी सबाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर बहिण सोमी देखील लाल साडीत दिसली. ती डान्स करताना दिसली. तर आदिल दुर्रानी देखील व्हाईट शेरवानीत दिसला.