मनोरंजन

Radhika Apte : मराठमोळी राधिका बोल्ड अवतारात ‘लय भारी’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळ्या राधिका आपटेने आपला बोल्ड अवतार दाखवला आहे. (Radhika Apte) राधिका आपटे आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. ती नेहमीप्रमाणे यंदाही हॉट आणि बोल्ड दिसते. तिने एकापेक्षा एक फोटो शेअर केल्यानंतर फॅन्सनी तिच्या या फोटोंना भरभरून दाद दिलीय. राधिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.  (Radhika Apte)

तिने आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटों तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना लय भारी अशी कमेंट पाहायला मिळत आहे. तिचे फॅशन पाहून अनेकांना तिला कमेंट करायला मोह आवरत नाही.

राधिका आपटेने पार्च्ड, पॅडमॅन, रात अकेली है, रक्तचरित्र २, शोर इन द सिटी, मांझी द माउंटमॅन, बदलापूर, हंटर यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. तिने मराठी, तमिळ, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

न्यूड सीन दिल्यामुळे तिची बरीच चर्चा झाली होती. हा सीन २०१६ मध्ये रिलीज झालेला पार्च्ड चित्रपटांतील होता. राधिका २०१७ मध्ये चर्चेत आली होती. शिवाय बाथरुमध्य बाथ घेतानाचा कथित सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण, या फोटोवर तिने स्पष्टीकरण दिलं होतं. त्या फोटोमध्ये तिने आपण स्वत: नसल्याचं म्हटलं होतं.

६ सप्टेंबर, १९८५ जन्मलेल्या राधिकाने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. राधिकाला सर्वात पहिल्यांदा २००५ मध्ये वाह लाईफ हो तो ऐसी यामधून छोटी भूमिका मिळाली होती. यानंतर शोर इन द सिटी, रक्त चरित्र आणि रक्त चरित्र-२, द वेटिंग रूम आणि आय एममधून तिला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली. यानंतर राधिकाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, बंगालीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT