अभिनेते सतीश सलागरे यांची 'मुलगी पसंत आहे' मालिकेत एन्ट्री instgram
मनोरंजन

'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेते सतीश सलागरे झळकणार 'या' भूमिकेत

Mulagi Pasant Aahe | 'मुलगी पसंत आहे' मालिकेत अभिनेते सतीश सलागरे यांची धमाकेदार एन्ट्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सन मराठी' वाहिनीवरील 'मुलगी पसंत आहे' ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेत शकुंतलाचा नवरा दयानंद या पात्राची एन्ट्री होणार आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मन जिंकून घेणारे अभिनेते सतीश सलागरे दयानंद या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अनेकदा त्यांनी खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. दयानंद हे पात्र दिसायला खूप साधा सरळ आणि सज्जन असलं तरी त्याचा खरा उद्देश हा संपूर्ण सरनाईक कुटुंबाला आणि मुख्यतः तारा व श्रेयसला मुळापासून उध्वस्त करण्याचा आहे. दयानंद ताराच्या आयुष्यातील अडचणींमध्ये आणखी भर घालण्यासाठी आला आहे. मालिकेत शकुंतला व दयानंद मिळून ताराच्या विरोधात कोणता नवा डाव रचणार हे पाहणं रंजक ठरेल.

सध्या मालिकेत शकुंतला ताराचा छळ करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. पण तारा प्रत्येकवेळी कठीण प्रसंगातून मार्ग काढत आहे. तारा-श्रेयसला वेगळं करण्यात शकुंतला आणि दयानंद यशस्वी ठरेल का ? तारा शकुंतलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकेल? तारा दयानंदचा उद्देश पूर्ण होऊन देईल का ? दयानंदशी सामना करताना तारा श्रेयसला कायमचं गमावून बसेल का ? आता मालिकेत नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी 'मुलगी पसंत आहे' सोम. ते शनि. सायंकाळी ७ वाजता पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT