Paresh Rawal not play role babu bhaiya in hera pheri 3 movie  x account
मनोरंजन

Babu Bhaiya Paresh Rawal Quits Hera Pheri 3 | 'बाबू भैया नाही तर श्याम देखील नाही..' हेरा फेरी ३ मधून परेल रावल बाहेर?

Paresh Rawal Quits Hera Pheri 3 | 'बाबू भैया विना श्याम देखील नाही..', अशी सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे

स्वालिया न. शिकलगार

Paresh Rawal Quits Hera Pheri part 3

मुंबई : त्रिकूट अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलची सुपरहिट कॉमेडी फ्रेंचायजी हेरा फेरी विषयी अपडेट न्यूज समोर आलीय. या चित्रपटामध्ये परेश रावल यांनी बाबूराव गणपतराव आपटेची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना तुफान आवडली होती. चित्रपटाचा तिसरा भागाबद्दल दिग्दर्शक प्रियदर्शनने जानेवारी २०२५ मध्ये पुष्टी केली होती. आता बाबू भैय्या अर्थातच परेश रावल चित्रपटातून बाहेर झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

परेश रावल हेरा फेरी -३ मधून बाहेर

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, अभिनेते परेश रावल यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे की, ते आता हेरी फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार नाहीत. चित्रपटातून बाहेर पडल्याच्या प्रश्नावर त्यांनी "हो, हे सत्य आहे,' असे उत्तर दिलं आहे.

चित्रपट समीक्षक सुमित कादेलने भी सोशल मीडिया पोस्ट करून याविषयी माहिती दिलीय. परेश रावल क्रिएटिव्ह डिफरेन्सेसमुळे चित्रपटातून बाहेर पडले आहेत.

सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३' वर दिली प्रतिक्रिया

बाबू भैया के बिना श्याम नहीं असे म्हणत सुनील शेट्टीने म्हटलं की, 'जेव्हा हेरा फेरीची गोष्ट येते तेव्हा यात जर बाबू भैया (परेश रावल) आणि राजू (अक्षय कुमार) नाही, तर श्याम (सुनील शेट्टी)चे अस्तित्व नाही. मग कोणत्याच गोष्टीला अर्थ राहत नाही. जर यापैकी एका कुणाला जर बाहेर करत असाल तर चित्रपट चालणार नाही.' सुनील शेट्टी 'केसरी वीर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याने 'हेरा फेरी ३' विषयी म्हटलं की, को-स्टार्स अक्षय कुमार आणि परेश रावल सोबत काम करायला खूप मजा येते.

२००० मध्ये कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी चित्रपट आणला होता. त्यामध्ये राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनील शेट्टी) आणि बाबू राव (परेश रावल) यांनी धुमाकूळ घातला होता. हेराफेरी चित्रपट यशस्वी झाला. पुढे त्याचा सिक्वेल हेरा फेरी २००६ मध्ये आला आणि त्यालाही खूप यश मिळाले. आता त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT