Mayank Gandhi-Hunar Hale Divorce update
मुंबई - हुनर हाली आणि मयंक गांधी घटस्फोट घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनी घटस्फोटाची कार्यवाही आजपासून सुरू केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे कपल कोर्टाबाहेर दिसत आहेत.
अभिनेत्री हुनर हाले आणि अभिनेता मयंक गांधी यांच्या ९ वर्षांचा संसार आता तुटण्याच्या मार्गावर आहे. या जोडीने २०१६ साली दिल्लीमध्ये पारंपरिक विधींनी विवाह केला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यातील तणाव वाढल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, दोघे काही काळ वेगवेगळ्या घरी राहत होते.
व्हायरल झाला व्हिडिओ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हुनर हाली आणि मयंक गांधी एका कोर्टाच्या बाहेर दिसत आहेत. पण, दोघांच्याही घटस्फोटाची कार्यवाही विषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण, कोर्टाबाहेरून व्हिडिओ समोर आला आहे. या क्लिपमध्ये दिसते की, एकीकडे हुनर एका वकिलाशी बोलत आहे. नंतर ती कोर्टात जाते. तर कोर्टातून बाहेर येताना मयंक पापराझींना पाहून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते.
video-viralbhayani insta वरून साभार
हुनर आणि मयंकचे लग्न
हुनर हाली - मयंक गांधीने २०१६ मध्ये विवाह केला होता. त्यांचे लग्न पारंपरिक पंजाबी पद्धतीने दिल्लीतील ग्रेटर कैलाशमधील पहाडीवाले गुरुद्वारा मध्ये झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुनर आणि मयंक यांची पहिली भेट कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. त्यांचे अरेंज मॅरेज होते.
हुनरने 'पटिया बेब्स', 'कहानी घर-घर की', 'वीर हनुमान' सारख्या मालिकेत काम केलं आहे. तर मयंकने 'काला टीका', 'अदालत' सारख्या मालिकांमध्ये अभिय केला आहे.