बॉलिवडू अभिनेता दिनो मोरिया. File Photo
मनोरंजन

Actor Dino Morea Arrested : बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, कोणत्‍या प्रकरणात पोलिसांनी केली कारवाई?

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Actor Dino Morea Arrested: बॉलिवडू अभिनेता दिनो मोरियाला आज (दि. २ ऑक्‍टोबर) मुंबई आर्थिक गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने अटक केली. या कारवाईने बॉलीवूडमध्‍ये खळबळ उडली आहे.

कोणत्‍या प्रकरणात पोलिसांनी केली कारवाई?

मिठी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात (desilting) झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया याची दुसऱ्यांदा चौकशी केली. या प्रकरणात मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो रोको मोरिया यांची यापूर्वी मे २०२५ मध्येही चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींशी संपर्क झाल्याचे दर्शवणारे फोन रेकॉर्ड्स तपासादरम्यान आढळल्यानंतर दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावले होते, असे पोलिस सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

फोन कॉल डिटेल्सची तपासणीत दिनो मोरियाचे नाव समोर

"या प्रकरणातील काही संशयितांच्या फोन कॉल डिटेल्सची तपासणी करत असताना दिनो मोरियाचे नाव समोर आले. त्याच्याशी संपर्क झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. मोरिया बंधू आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी केतन कदम याची पत्नी पुनिता कदम हे तिघे 'युबीओ रायडेझ प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत संचालक आहेत. सध्या पोलीस केतन कदम आणि सँटिनो मोरिया यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. याशिवाय, केतन कदम याच्या 'वोडार इंडिया एलएलपी' या कंपनीला पालिकेचे कंत्राट नेमके कसे मिळाले, याचाही तपास सुरु आहे.

६५.५४ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण

मिठी दीच्या गाळ उपसा प्रकल्पात मुंबई महानगरपालिकेची ६५.५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केतन कदमसह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७ मे रोजी केतनला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात निविदांमध्ये फेरफार, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.

विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू

मीठी नदीच्या १७.८४ किलोमीटर लांबीच्या पात्रातील गाळ उपशात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी केला होता. या आरोपानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. कंत्राटदारांना अवाजवी फायदा पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे बिल वाढवण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून गाळाचे प्रमाण फुगवून दाखवल्याचे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT