Actor Darshan Pudhari
मनोरंजन

Actor Darshan: हाताला बुरशी, मळलेले कपडे.. मला आता सहन होत नाही.. मला विष द्या; अभिनेता दर्शनची न्यायालयाकडे मागणी

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला अभिनेता दर्शन सध्या चर्चेत

अमृता चौगुले

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला अभिनेता दर्शन सध्या चर्चेत आहे. दर्शनने त्याच्या मासिक सुनावणी दरम्यान त्याने केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दर्शनने सांगितले की तो या ठिकाणी आता राहू शकत नाही. त्याची स्थिती अत्यंत बिघडली आहे. असे जगण्यापेक्षा 'मला मृत्यू द्या' अशी मागणीही त्याने यावेळी केली. (Latest Entertainment News)

मासिक सुनावणी दरम्यान व्हीडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 64 वे सिटी सिव्हिल आणि सेशन कोर्टमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी त्यांची अवस्था या दरम्यान सांगितली. ते म्हणतात, ‘त्याच्या हातात फंगस (बुरशी)लागली आहे. त्यांच्या कपड्यांना दुर्गंधी येते आहे. जेल मध्ये अशी परिस्थिति आहे की ऊनही मिळत नाही. सगळीकडून अंधार येतो आहे. पुढे तो म्हणतो, ‘मी आता असा राहू शकत नाही. मला विष द्या. हे आयुष्य आता असह्य झाले आहे.’ त्याचे हे विधान ऐकून कोर्टातील प्रत्येकजण अवाक झाला आहे.

दर्शनने केली गादी आणि बिछान्याची मागणी

दर्शनने बेल्लारी जिल्ह्यातील जेलमधील स्थानांतरण टाळण्यासाठी त्याने गादी आणि बिछान्याची मागणी केली असल्याचे समोर आले. त्याला डिसेंबर 2024 मध्ये जामीन मंजूर केला होता. पण 14 ऑगस्ट ला त्याचा जामीन नामंजूर केला गेला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की त्याला जेलमध्ये कोणतीही खास सुविधा देण्यात येऊ नये.

का अटक झाली होती दर्शनला?

चित्रदुर्गचा रहिवासी असलेल्या रेणुकास्वामीचे अपहरण आणि हत्याच्या आरोपात दर्शनला अटक केली होती. सहकारी पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज केल्याच्या कारणावरून दर्शनने रेणुकास्वामीचे अपहरण केले होते. यानंतर एका शेडमध्ये त्याला निर्घृण मारहाण ही केली होती. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे शव नाल्यात फेकले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT