Dussehra 2025 Bobby Deol special role
मुंबई - दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर यंदा लाल किल्ला मैदानावरील रामलीलेत एक खास सरप्राईज असणार आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल प्रभु रामाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असून, ‘रावणवधा’चा सोहळा यावेळी पार पडणार आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला समितीने यंदाच्या सोहळ्यासाठी खास तयारी केलीय. बॉबी देओलला आमंत्रित केल्यानंतर त्याने या भूमिकेसाठी होकार दिला.
लाल किल्ला मैदानावरील होणारी रामलीला दिल्लीकरांसाठी मोठा सोहळा ठरते. हजारो लोकांच्या उपस्थितीत रावणावर बाण सोडून विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन केले जाते. बॉबी देओल यावर्षी या ऐतिहासिक परंपरेचा भाग बनणार असल्याने सोशल मीडियावर देखील या सोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे.
बॉबी देओल गेल्या काही वर्षांत आपल्या दमदार अभिनयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘आश्रम’ या वेब सीरीजमधून त्याने फॅन्सच्या मनावर वेगळी छाप सोडली, तर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटात त्याच्या निगेटिव्ह भूमिकेचेही भरभरून कौतुक झाले. अशा वेळी धार्मिक आणि पौराणिक संदर्भात प्रभू राम यांची भूमिका साकारणे ही त्याच्या करिअरमधील वेगळेपण ठरणार आहे. (latest entertainment news)
लव कुश रामलीला कमिटीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितले की, जेव्हा बॉबी देओलला दसऱ्याला रावण वध करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्याने आमंत्रण स्वीकारलं. समितीचे मानणे आहे की, बॉबी देओलचे या ऐतिहासिक मंचावर येणे, 'रामलीला' आणखी अविस्मरणीय बनवेल.
दसऱ्याच्या दिवळी लाल किल्ल्याच्या मैदानावर बॉबी देओल रामाची भूमिका साकारताना दिसेल. यावेळी राजधानीसह हजारोंच्या संख्येने लोक संध्येला या टिकाणी उपस्थित असतात.