हरियाणवी अभिनेता उत्तर कुमारला अटक करण्यात आली आहे. गाजियाबाद पोलिसांनी एका फार्महाऊसवरुन त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर एका अभिनेत्रीवर बलात्कार आणि जातिवाचक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. 2020पासून शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्याने अभिनेत्रीने आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे. हरियाणवी सिनेमे आणि एल्बमच्या दुनियेत उत्तर कुमारचे नाव प्रसिद्ध आहे. (Latest Entertainment News)
यावेळी पोलिसांना घटनाक्रम सांगताना अभिनेत्री म्हणाली, ती 2020 मध्ये एका हरियाणवी अल्बम दरम्यान उत्तर कुमार यांना भेटली होती. त्यावेळी तिने नुकतीच अभिनयाची सुरुवात केली होती. त्यावेळी उत्तर कुमार यांनी तिला सिनेमात उल्लेखनीय काम देण्याचे कबूल केले होते. पण शूटिंगनंतर तिच्यावर दबाव टाकत बलात्कार केला.
अनेकदा तीने याला विरोध करण्याचा प्रयत्नही केला. पण करियर खराब करण्याची धमकी देऊन त्याने हा प्रकार सुरूच ठेवला. तसेच पीडितेला अनेकदा जातीवाचक शिवीगाळ केली.
हा प्रकार बराच काळ सहन केल्यानंतर पीडित अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत लैंगिक शोषण, धमकी देणे आणि जातिवाचक शिवीगाळ असे आरोप आहेत.
पीडिताने तिच्या तक्रारीची दाखल घेतली नाही म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न ही केला होता. यानंतर सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.
उत्तर कुमार हे हरियाणवी सिनेमातील अत्यंत नावाजलेले नाव आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील सिनेमे आणि गाणी यामुळे त्याला कमी वेळात लोकप्रियता मिळाली.