Acting on court directives, Ranveer Singh offered prayers to the Goddess at the Chamundeshwari Temple
पुढारी ऑनलाईन : रणवीर सिंहने कर्नाटकातील चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात जावून देवीचे दर्शन घेतले. या मंदिर रणवीर दर्शनाला येण्यामुळे ‘कांतारा’ मिमिक्री वादाची चर्चा होत आहे. आयएफएफआय (IFFI) 2025 च्या समारोप सोहळ्यात रणवीरने केलेल्या मिमिक्रीमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी कर्नाटकमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज रणवीर सिंहने चामुंडेश्वरी मंदिरात आपली हजेरी लावली. या भेटीदरम्यान रणवीर सिंहने स्वतःला लो-प्रोफाइल ठेवले. पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळे वेस्टकोट परिधान करून तो मंदिरात पूजा करताना दिसला. याआधी त्याला मुंबई विमानतळावरही पाहण्यात आले होते. तेव्हा ‘डॉन 3’ वादामुळे सुरू असलेल्या चर्चेमुळे त्याने पापाराझींपासून अंतर ठेवले होते आणि चेहरा मास्कने झाकलेला होता.
‘डॉन 3’ चित्रपटावरील वादाच्या पार्श्वभूमीवर रणवीर सिंह मैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा पूजा करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘कांतारा’ मिमिक्री प्रकरणाच्या तोडग्याचा भाग म्हणून रणवीर सिंह याने चामुंडेश्वरी मंदिरात जावे, असे निर्देश दिल्यानंतर काही आठवड्याने त्याने ही भेट दिली.
दरम्यान, रणवीर सिंह आणि Farhan Akhtar यांच्यात ‘डॉन 3’ संदर्भात वाद सुरू आहे. रणवीरने हा चित्रपट सोडल्याने Excel Entertainment ला तब्बल 45 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीर सिंह याच्याकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सोमवार, 25 मे रोजी FWICE ने रणवीर सिंहने ‘डॉन 3’ मधून अचानक माघार घेतल्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. फेडरेशनने रणवीर सिंहच्याविरोधात असहकाराचा आदेश जारी केला.
फेडरेशनचा आरोप आहे की रणवीर सिंहला तीन वेळा बोलावण्यात आले, मात्र तो एकदाही फेडरेशनसमोर हजर राहिला नाही. त्याने फेडरेशनकडे दुर्लक्ष केले आणि कोणतेही उत्तर दिले नाही. मुख्य सल्लागार Ashoke Pandit, अध्यक्ष Birendra Nath Tiwari आणि महासचिव Ashok Dubey यांनी माध्यमांना FWICE च्या निर्णयाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, रणवीर सिंहने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याच्या सुमारे तीन आठवडे आधीच चित्रपट सोडला होता. पत्रकार परिषदेदरम्यान अशोक पंडित यांनी हेही स्पष्ट केले की, फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शन हाऊसने रणवीर सिंह याच्याकडे 45 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.