सध्या मराठी सिनेसृष्टीत घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी पत्नी नेहासोबत डिवोर्सबाबत पोस्ट केली. तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही देखील संगीतकार पतीपासून वेगळे झाली आहे. (Latest Entertainment News)
या दरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी एक उपहसात्मक पोस्ट शेयर केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रिय मित्रांनो, प्रत्येकजण माझ्या प्रवासात आपापल्या पद्धतीनं एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत एक वैयक्तिक अपडेट शेअर करू इच्छितो आहे. मी तुमच्यापैकी काहिंसोबत बातमी आधीच शेअर केली आहे. 27 वर्षांच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणींनंतर, अश्विनी आणि मी परस्परांनी एकत्र राहण्याचा आणि आमचे जीवन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा कायदेशीर विवाह फेब्रुवारी 1998 मध्ये पार पडला.
मी ही अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. कारण वैयक्तिक पातळीवर या बदलाशी जुळवून घेणे सोपे जावे. विशेषतः आमच्या मुलींच्या हितासाठी. ते माझं सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी अश्विनीसोबत त्यांचं अतूट प्रेम, पाठिंबासह सह-पालकत्व करण्यास वचनबद्ध आहे. पालक म्हणून आमचे बंधन आणि आम्ही एकमेकांबद्दल असलेला आदर अजूनही मजबूत आहे.या काळात आमच्या गोपनीयतेबद्दल आणि निर्णयाबद्दल तुमच्या समजूतदारपणा आणि आदराबद्दल मी खरोखर आभारी आहे.’ हल्ली सगळंच सोशल मीडियावर शेअर करण्याची पद्धत आहे, म्हणून मीही.. असे म्हणत त्यांनी पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टवर अनेक नेटीझन्स धमाल कमेंट करत आहेत.