पुढारी ऑनलाईन डेस्क - 'बिग बॉस १६' फेम अब्दु रोजिकने आपले लग्न मोडल्याचे वृत्त समोर आले आहे. तो लग्न करणार होता. मध्येंतरी त्याचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. आणि त्याने सांगितलं होतं की, तो लग्न करणार आहे. पण, आता तो अमीराशी लग्न करणार नाही. अब्दूने सांगितलं की, त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं नातं होतं. पण, सांस्कृतिक मतभेदांमुळे ते पुढे नेण्यासाठी खूप कठीण झाले. पण, हे नाते तोडणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. (Abdu Rozik)
रिपोर्टनुसार, अब्दु रोजिकने सांगितलं, 'जस-जसे आमचे नाते डेव्हलप झाले होते, त्यामध्ये सांस्कृतिक मतभेद होत होते. यासाठी निर्णय बदलावा लागला. सर्वजण जाणतात की, मी माझ्या जीवनात किती अडचणींचा सामना करत आहे. यासाठी एक असा साथी हवा आहे जो मानसिकरित्या मजबूत असावा आणि पुढील प्रवासात साथ देणारा असावा.'
मला विश्वास आहे की, योग्य वेळ आल्यानंतर मला पुन्हा माझं प्रेम मिळेले. मी आता तुमचे समर्थन आणि शुभेच्छांसाठी आभार मानतो.- अब्दु रोजिक
अब्दु रोजिकने म्हटलं की, मी माझ्या हिमतीवर हे स्थान मिळवलं आहे. सर्व क्रेडिट मी स्वत: ला देतो.
अब्दुला सर्वांनी पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे त्याला फेमस होण्यासाठी मदत मिळाली. त्याची कुणाशीही ओळख झाली की, त्याने चांगले नाते निर्माण केले. त्यांचे आभार मानले.