Aankhon Ki Gustaakhiyan Vikrant Massey-Shanaya Kapoor
मुंबई - रिमझिमत्या पावसात आँखों की गुस्ताखियां घेऊन येत आहे एक सुंदर लव्ह स्टोरी. विक्रांत मेस्सी - शनाया कपूर स्टारर चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. प्रेम, इमोशन्सने भरपूर व्हिडिओमध्य़े शनायाच्या डोळ्यावर काळी पट्टी दिसतेय. तर विक्रांतच्या डोळ्यावर गॉगल आहे. यावरून अंदाज लावता येतो की, ही ब्लाईंड लव्ह स्टोरी असेल.
टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे की, कशा प्रकारे दोन लोक अचानक भेटतात. आणि त्यांची कहाणी सुरू होते. इशाऱ्यांनी, संगीताच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं जातं. पण, नंतर दुरावा देखील पाहायला मिळतो. टीजरमध्ये डान्सच्या प्रवासातील काही सीन या नात्यांना खास बनवतं. टीजरमध्ये विशाल मिश्राचे संगीत आणि सुंदर लोकेशन या लव्ह स्टोरीला विशेष बनवतं.
जी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्सने चित्रपट सादर केला आहे. मानसी बागला, वरुण बागलाची निर्मिती तर दिग्दर्शन संतोष सिंह यांचे आहे. कहाणी मानसी बागलाने लिहिली आहे. ११ जुलै, २०२५ रोजी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल.