मनोरंजन

आनंद एल राय यांच्या नखरेवाली चित्रपटात दोन नवे चेहरे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद एल राय यांचे प्रॉडक्शन हाऊस कलर यलो प्रॉडक्शन आणि त्यांचा नवीन चित्रपट "नखरेवाली" चित्रपटाचे शूट यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा त्यांनी केली आणि या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव या दोन उदयोन्मुख कलावंतांची प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित बातम्या –

जिओ स्टु़डिओ प्रस्तुत कलर यलो प्रॉडक्शन्स निर्मित 'नखरेवाली' चित्रपटाची दिग्दर्शक आणि निर्माता आनंद एल राय आहेत. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय.

रॅप-अप सेलिब्रेशनला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यात हिमांशू शर्मा, दिग्दर्शक राहुल शांकल्या आणि लेखिका दिव्य निधी शर्मा यांच्या सोबतीने अनेक कलाकार देखील होते. हा चित्रपट संपूर्ण एंटरटेनर असणार आहे, अशी आशा आनंद एल राय यांनी व्यक्त केली.

चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल शांकल्या यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद. एल. राय, ज्योती देशपांडे, हिमांशू शर्मा यांची आहे.

"शुभ मंगल सावधान," "तनु वेड्स मनु," आणि "रांझना" सारख्या चित्रपटांनी आयकॉनिक दर्जा प्राप्त केला आहे. आता "नखरेवाली" ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सज्ज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT