आमिर खानच्या ‘हॅप्पी पटेल’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून नव्या वर्षात हा चित्रपट मोठा धमाका ठरण्याची शक्यता आहे. हलकाफुलका आणि मनोरंजक असा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
vir das-mona singh starrer Aamir Khan Film Happy Patel release announce
मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना मोठी भेट देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘हॅप्पी पटेल’ची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली असून, अनेक महिन्यांपासून या चित्रपटाबद्दल विविध चर्चा सुरू होत्या. अखेर आमिर खानने स्वतः हा अपडेट देत प्रतीक्षा संपवली.
हा धमाकेदार गुप्तहेर चित्रपट असेल. या चित्रपटातून वीर दासने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. पदार्पणाचा टप्पा ठरतो, ज्यात वीर दास आणि मोना सिंग मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
‘हॅप्पी पटेल’ हा हलकाफुलका, विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले जाते. आमिर खानने याआधी सोशल मीडियावरून चित्रपटाचे काही बिहाइंड द सीन फोटो शेअर करत “या वर्षी काहीतरी मजेदार घेऊन येतोय” असे सांगितले होते. हॅपी पटेलची घोषणा अगदी हटके करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये आमिर खान, वीर दासला विचारताना दिसतात की तो आपल्या फिल्ममध्ये अॅक्शन, रोमान्स आणि अगदी आयटम नंबरही कशा अंदाजात दाखवणार आहे. आमिरला सतत याची चिंता वाटताना दाखवलं आहे की प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील; तर दुसऱ्या बाजूला व्हिडिओतील इतर लोक चित्रपटाची कौतुक करताना दिसतात.
आमिर खान प्रोडक्शन्सचा हा चित्रपट नेहमीच्या आशयापेक्षा वेगळा ठरणार आह. लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार चित्रपटांनंतर तो आणखी एक चित्रपट घेऊन येतोत. यामध्ये स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास दिसणार आहे. त्याने याआधी गो गोवा गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हॅपी पटेल हा वीर दासचा दिल्ली बेली नंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबतचा दुसरा चित्रपट आहे.
हा चित्रपट १६ जानेवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.