Aamir Khan on Gauri Spratt relationship
मुंबई - अभिनेता आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट यांच्याबद्दल सगळीकडे चर्चा होत असताना आता अभिनेत्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये, आमिर खानने गौरी स्प्रॅटसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि त्याच्या एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले.
१४ मार्च रोजी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ६० वर्षांचा झाला. या खास प्रसंगाचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने मीडियासोबत पत्रकार परिषद घेतली जिथे त्याने पाहुण्यांना त्याची नवीन प्रेयसी गौरी स्प्राटची ओळख करून दिली होती. आमिरने असेही उघड केले की, गेल्या एक वर्षाहून अधिक काळ ते एकत्र आहेत. केवळ आमिरच नाही तर त्याची एक्स पत्नी किरण राव आणि त्याची मुले इरा खान आणि जुनैद खान देखील गौरीमध्ये पुन्हा प्रेम मिळाल्याबद्दल आनंदी आहेत. शिवाय, त्याने पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, तो गौरीला 'चुकीने' भेटला होता.
पॉडकास्टमध्ये आमिरने सांगितलं की, "गौरीला भेटण्यापूर्वी, मला असे वाटत होते की, मी आता वयस्कर झालो आहे. या वयात मला कुणी भेटेल. सोबतच माझी थेरपी सुरु झाली. मला समजले की, मला स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि आधी स्वत:वर प्रेम, आत्म-प्रेम आणि आत्म-सन्मानाची गरज आहे. यावर मी काम सुरु केलं. त्यावेळी मी माझ्या मित्रांना देखील सांगितलं की, किरण आणि रीना सोबत माझे चांगले नाते आहे आणि आज आम्ही जवळ देखील आहोत. आम्ही एकमेकांचे सन्मान देखील करतो. मी कधी विचार देखील केला नव्हता की, मी अशा व्यक्तीला भेटेने, जिच्यासोबत माझे नाते जुळेल."
आमिर पुढे म्हणाला की, "गौरी आणि मी चुकून भेटलो, आम्ही मित्र झालो आणि प्रेम झालं. मला वाटलं की, माझी आई, भाऊ-बहिण आहेत- माझे इतके जवळचे नाती आहेत, मला कुणाची गरज नाही." आमिर म्हणाला की, तो कधी एकटा राहिलेला नाही, कारण त्याच्याकडे चांगली नाती आणि एक जवळचा परिवार आहे. वास्तवात, आजपर्यंत मी नियमितपणे रीना आणि कारणला भेटतो आणि आम्ही एकत्र काम देखील करतो. रीना आणि मी, किरण आणि मी, नेहमी परिवार राहू. पती-पत्नी कदाचित नसेन, पण, नेहमीच परिवार राहू. त्या माझ्या कुटुंबाचा एक अतुट हिस्सा आहेत."