पुढारी ऑनलाईन डेस्क - 'आई तुळजाभवानी' ही मालिका आता एका रंजक आणि प्रभावशाली वळणावर येऊन पोहोचली आहे. तुळजाई महात्म्यातील कुक्कुरासुर वधाची ऐतिहासिक महागाथा प्रेक्षकांना या आठवड्यात अनुभवता येणार आहे. ज्यात देवीचा भक्तीभाव, तिची शौर्यगाथा, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तिची जिद्द दिसून येईल. (Aai Tuljabhavani )
आजच्या भागात तुम्ही पाहू शकता की, असुराणी पळवलेल्या बाळाच्या शोधासाठी अनुभूती देवीची आराधना करते आणि आई तुळजाभवानी देवी तिच्या भक्ताची हाक ऐकून येते. आई तुळजाभवानी मातेने अनुभूतीमातेला आश्रमाच्या वेशीपर्यंत आणून सोडले आणि स्वतः बाळाच्या शोधातात निघून गेली. आईने अनुभूती मातेला वचन दिले की, ती बाळाला घेऊन परत येणारं. आईने थेट सांगितले की, बाळाला परत आणे मी स्वस्त बसणार नाही. बाळ कुठेही असले तरी आम्ही त्याला शोधून काढू.