3 Idiots Actor Rahul Kumar Instagram
मनोरंजन

3 Idiots Actor Rahul Kumar| 3 इडियट्सचा मिलीमीटर आता दिसतो असा, पत्नी आहे तुर्कीची, दिसते इतकी सुंदर

3 इडियट्सच्या मिलीमीटरचा नवा व्हिडिओ, पत्नी आहे तुर्कीची, दिसते इतकी सुंदर

स्वालिया न. शिकलगार

3 Idiots Actor Rahul Kumar got married

मुंबई - तब्बल १६ वर्षांनंतर थ्री-इडियट्स फेम मिलीमीटर अर्थातचच राहुल कुमार आता पुन्हा समोर आला आहे. त्याचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका तरुणीसोबत दिसत आहे. इतक्या वर्षांमध्ये त्याचा लूक खूप बदललेला दिसतोय. ती तरुणी तुर्कीची असून अखेर तिने भारतीय पोषाख परिधान केला आहे. इतकच नाही तर तिने सिंदूर देखील लावले आहे.

खरंतर राहुलची पत्नी तुर्कीची आहे. तिचे नाव केजिबान दोगान आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागील आठवड्यात दिल्लीच्या पोर्ट्रेट फोटोग्राफरने एक व्हिडिओ शेअर केला की, ३ इडियट्सच्या मिलीमीटरने लग्न केले, तुर्कीच्या वधूशी, फोटो पाहून ओळखणार नाही. आता १६ वर्षांनंतर राहुलचा त्याची पत्नी केजिबान दोगान सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशीचा २००९ चा हिट कॉमेडी ड्रामा "३ इडियट्स" ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला होता. यामध्ये बोमन ईरानी, डॉ. वीरू 'व्हायरस' सहस्त्रबुद्धे ते ओमी वैद्यच्या चतुर 'साइलेंसर' रामलिंगम पर्यंत प्रत्येक भूमिका हिट ठरली. आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे मिलीमीटर. आमिर (रँचो), माधवन (फरहान) आणि शरमन जोशी (राजू) ला कॉलेजमध्ये त्यांच्या कामात मदत केलेली असते. राहुल कुमारने मिलीमीटरची भूमिका साकारली होती, जी आजही लक्षात आहे.

राहुल कुमारने नुकतेच आपल्या तुर्की पत्नीबरोबरचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राहुलची पत्नी तुर्कीची रहिवासी असून मॉडेलिंग आणि सोशल मीडियावर ॲकटिव्ह आहे. ती दिसायला खूप सुंदर असून सोशल मीडियावर लक्षवेधी ठरलीय.

video-therealstreets_ instagram वरून साभार

‘मिलीमीटर’ने ‘३ ईडियट्स’मध्ये छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिकेत काम केलं होतं. “मिलीमीटरला सेंटीमीटर बनायचंय!” हा त्याचा संवाद आजही प्रेक्षकांना आठवतो. त्यानंतर राहुलने ‘ओमकारा’, ‘द शेक्सपीअरवाला’, ‘जुबिली’सारख्या प्रोजेक्ट्समध्येही काम केलं.

सध्या राहुल परदेशात राहत असून डिजिटल आणि थिएटर प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून चाहते म्हणत आहेत, “मिलीमीटर आता खरोखर सेंटीमीटर नाही, तर किलोमीटर झाला आहे!” फोटोंमध्ये राहुल सूट-बूटमध्ये दिसतो आहे.

दिल्लीच्या फोटोग्राफरने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल आणि केजिबान त्यांच्यासोबत बातचीत करताना दिसतात. राहुल म्हणतो, "मी राहुल आहे, ती माझी पत्नी केजिबान दोगान आहे, आणि ती तुर्कीची आहे." जेव्हा त्याला विचारण्यात आलं की, तो विवाहित आहे? तेव्हा केजिबानने उत्तर दिलं, "हो, आम्ही ४ म पासून विवाहित आहे." केजिबानने पुन्हा सांगितलं की, त्यांची भेट आमिर खानचा चित्रपट "३ इडियट्स"च्या वर्ल्डवाईड यशामुळे झाली होती. ती म्हणाली, "मी हा चित्रपट पाहिला होता. त्यामध्ये हा अभिनेता आहे. मिलीमीटर, तुम्हाला माहिती आहे का? मी त्याला मेसेज केला होता. आणि आम्ही बोललो. मला वाटतं की १४ वर्षांपूर्वी." हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT