The Odyssey | Christopher Nolan Pudhari
मनोरंजन

The Odyssey tickets | चित्रपट प्रदर्शित व्हायला 1 वर्ष बाकी, तरीही नोलनच्या 'द ओडिसी'ची तिकीटे केवळ 3 मिनिटांत संपली...

The Odyssey tickets | न्यू यॉर्क, लॉस एंजल्स, सॅन फ्रान्सिस्को, लंडन येथे IMAX स्क्रीन्सवरील खास प्रदर्शन

Akshay Nirmale

Director Christopher Nolan's The Odyssey IMAX tickets sold in just 3 minitus film will be release after 1 year

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपट The Odyssey चित्रिकरणाला सुरवात झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाची हाईप एवढी झाली आहे की, चित्रपट प्रदर्शित व्हायला अद्याप 1 वर्ष बाकी असतानाच या चित्रपटाची तिकीटे विकली गेली आहेत.

केवळ तीन मिनिटांत ही तिकिटे विकली गेली असून ही तिकीटविक्री जगभरातील प्रेक्षकांना, नोलनच्या चाहत्यांना चकित करणारी आणि अभूतपूर्व ठरली आहे.

एक वर्ष आधीच विक्री सुरू

IMAX ने गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर ही तिकीट विक्री सुरू होत असल्याची घोषणा केली होती. अमेरिका आणि कॅनडामधील एकूण 18 शहरांबरोबरच ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न, युरोपमधील लंडन आणि प्राग येथील IMAX स्क्रीन्सवरही ही तिकिटे विक्रीस आली होती.

गुरुवारी, म्हणजेच चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाच्या तारखेच्या (17 जुलै 2026) बरोबर एक वर्ष आधी, The Odyssey या चित्रपटाच्या IMAX स्क्रीन्सवरील खास प्रदर्शनासाठी तिकीट विक्री सुरू करण्यात आली. ही तिकीटे निवडक शहरांमध्ये – न्यू यॉर्क, लॉस एंजल्स, सॅन फ्रान्सिस्को आणि लंडन – याठिकाणी मर्यादित संख्येने उपलब्ध होती. पण केवळ काही सेकंदांमध्येच या सर्व तिकिटांचा खप झाला.

सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

गुरुवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर The Odyssey ची तिकीटे मिळवण्याचा अनुभव शेअर करणाऱ्या चाहत्यांची पोस्ट्स आणि व्हिडिओजचा पूर आला. ट्विटर (आता X) वर एका युजरने लिहिले, “IMAX 70MM साठीची तिकिटे केवळ 3 मिनिटांत संपली. Universal City Walk मध्ये 16 जुलैच्या शोसाठी फक्त काही जागा उरल्या होत्या.”

लॉस एंजल्समधील काही थिएटर्समध्ये ही विक्री एका मिनिटातच संपली, जी अलीकडच्या इतिहासात कोणत्याही चित्रपटासाठी घडलेली सर्वात वेगवान विक्री असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे ओडिसी?

ग्रीसचे महान कवी होमर यांच्या गाजलेल्या ओडिसी या महाकाव्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात मॅट डेमन Odysseus या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जो ट्रॉयच्या ट्रोजन युद्धानंतर आपल्या गावी Ithaca मध्ये परततो. त्याचा हा 10 वर्षांचा परतण्याचा प्रवास म्हणजे हे काव्य.

मल्टीस्टारर चित्रपट

चित्रपटात स्पायडर मॅनमधील अभिनेता टॉम हॉलंडने ओडिसीयसच्या मुलाची भूमिका साकारली आहे. शिवाय अ‍ॅन हॅथवे, झेन्डाया, ल्युपिटा न्यॉन्गो, रॉबर्ट पॅटिन्सन, चार्लीझ थेरॉन, जॉन बर्नथल, बेनी सॅफडी, जॉन लेगुझामो आणि एलिऑट पेज अशी भव्य स्टारकास्ट चित्रपटात आहे.

नोलनची जगभर फॅन फॉलोविंग

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन त्याच्या चित्रपटांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गहन आणि गुंतागुंतीची कथा त्याच्या अनेक चित्रपटांत पाहायला मिळते. पण त्यामुळे प्रेक्षकांना नवीन, काहीतरी वेगळे पाहल्याचा अनुभव मिळतो. नोलनच्या चित्रपटात वेळ, स्मृती, स्वप्ने यांसारख्या संकल्पनांवर आधारित नॉन-लिनिअर कथा असते. टाईम हे नोलनच्या चित्रपटात एखाद्या पात्रासारखा असतो.

नोलन चित्रपटाच्या चित्रिकरणात डिजिटलऐवजी 70mm IMAX फिल्म वापरण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील दृश्ये भव्य, तपशीलवार आणि थेट अनुभवण्यासारखी वाटतात.

नोलनच्या अनेक चित्रपटांना हान्स झिमरचे पार्श्वसंगीत असते. या दोघांनी एकत्रित खूप चांगले काम केले आहे.

नोलनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे CGI चा मर्यादित वापर. वास्तववादी दृश्यांसाठी शक्य तिथे नोलन खऱ्या लोकेशन्सवर प्रत्यक्ष सीन शूट करतो.

नोलनचे चित्रपट

ख्रिस्तोफर नोलनचे सर्वच्या सर्व चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत.

  1. मेमेंटो

  2. फॉलोविंग

  3. इन्सॉम्निया

  4. बॅटमॅन बिगिन्स

  5. द प्रेस्टिज

  6. द डार्क नाईट

  7. इन्सेप्शन

  8. द डार्क नाईट रायझेस

  9. इंटरस्टेलर

  10. डंकर्क

  11. टेनेट

  12. ओपनहायमर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT