पुढारी ऑनलाईन: आईमुळे एका व्यक्तीचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या व्यक्तीने आपली ओळख लपवून हा सर्व घटनाक्रम सोशल मिडीयावर सांगितला आहे. या २५ वर्षीय तरुणाने सांगितले की, आईच्या चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने 2010 मध्ये 6 हजार रुपयांना 10 हजार बिटकॉइन्स खरेदी केले होते, ज्याची किंमत आज 3000 कोटी रुपये आहे. त्या काळात हा व्यक्ती कॉलेजमध्ये शिकत असे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो कामावर जाऊ लागला. कामात व्यग्र झाल्यामुळे त्याने कधीकाळी बिटकॉइन्स विकत घेतल्या आहेत हे विसरून गेला.
आता काही काळ सर्वत्र क्रिप्टोकरन्सी मार्केटची चर्चा होत आहे. तरुणाला देखील याची माहिती मिळत होती. त्यानंतर अचानक त्याच्या लक्षात आले की, 2009 मध्ये आपण 10 हजार बिटकॉइन्स खरेदी केल्या आहेत. हि बाब लक्षात त्याने घाईघाईने घर गाठले आणि लॅपटॉप शोधू लागला. परंतु लॅपटॉप न मिळाल्याने त्याने आईला विचारले, माझा लॅपटॉप कुठे आहे? त्याचवेळी आईचे उत्तर ऐकून तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली. घरात असणारा लॅपटॉप कबाडखान्यात फेकून दिल्याचे त्याच्या आईने सांगितले.
आजच्या तारखेला 10 हजार बिटकॉइन्सचे मूल्य 3000 कोटी रुपये एवढे आहे. त्या व्यक्तीने सांगितले की, या संपूर्ण प्रकरणानंतर तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. आता तो नैराश्यातून बाहेर पडला आहे पण एवढी मोठी रक्कम हातातून गेल्याची खंत आजही आहे. बिटकॉइन एक आभासी चलन आहे. याची सुरुवात 2009 मध्ये झाली होती.