पुढारी ऑनलाईन डेस्क
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी चे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करूनही त्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यावर चर्चा सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (Anil Parba's warning)
याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी, कर्मचाऱ्यांना संप रद्द करून कामावर हजर रहावे अशी विनवणी केली आहे. मात्र कर्मचारी त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येतंय. याबाबत आज परब यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेवून संपकरी कर्मचाऱ्यांना गर्भित इशारा दिलाय.
काय म्हणाले अनिल परब ?
या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने एक पाऊल पुढे टाकत कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त रूपयांची घसघशीत वाढ केली. त्याचबरोबर जे कर्मचारी संप सोडून तात्काळ सेवेत हजर होतील त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही अनेक कर्मचारी संघटना विलिनिकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे. परिणामी अनेक ठिकाणी एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. (Anil Parba's warning)
हेही वाचा