Latest

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला चावला साप

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पनवेलच्या फार्महाउसवर काल रात्री सर्पदंश झाला. त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण सलमानला चावलेला साप बिनबविषारी असल्याने अनर्थ टळला असल्याचे समजते. सलमान खानला सर्पदंश झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली.

salman khan

सलमान खानचे पनवेल येथे अर्पिता फार्महाऊस आहे. येथे काल रात्री त्याला बिनविषारी सापाने दंश केला. पण साप बिनविषारी असल्याने सलमान सध्या सुखरूप आहे.

अभिनेता सलमान खानच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक 'बजरंगी भाईजान' आहे. चित्रपटाच्या कहाणी ते गाण्यांपर्यंत सर्वच फॅन्सच्या पसंतीस उतरले होते. आता नुकतचं सलमान खानने बजरंगी भाईजानचा सीक्वल येणार असल्याची मोठी घोषणा केलीय. सलमान खान आता दिल्लीमध्ये कॅटरीना कैफसोबत चित्रपट 'टायगर-३' चे शूटिंग करणार आहे. सलमानकडे आणखी एक 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट आहे. पण, अधिकृतरित्या त्याने या चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT