Latest

पावसाची आनंदवार्ता : महाराष्ट्रात यंदा किती पाऊस पडेल? ‘स्कायमेट’ने दिली महत्त्वाची अपडेट | Monsoon

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामान संदर्भात सेवा पुरवाणारी आघाडीची खासगी संस्था स्कायमेटने भारतात यंदा मान्सून सर्वसाधारण राहील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. असे जरी असले तरी मान्सूनची सुरुवात मात्र थोडी रखडलेली असणार आहे. भारतात यावेळी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस बरसेल असे स्कायमेटने म्हटले आहे. यात इरर मार्जिन ५ टक्केंचे आहे.  (Monsoon)

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग म्हणाले, "ला निना वेगाने एल निनोची जागा घेत आहे. ला निनाच्या वर्षांत मान्सूनचे चक्र जास्त प्रभावी असते. तसेच बळकट एल निनोकडून ताकदवान ला निनाकडे जेव्हा प्रवास होतो तेव्हा पाऊस चांगला होतो असा आतापर्यंतचा इतिहासा आहे."  (Monsoon)

पण मान्सूनच्या सुरुवातीला काही अडथळे येतील, तर उत्तरार्धात मात्र चांगला पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.  मान्सूनवर प्रभाव पाडणारा आखणी एक घटक म्हणजे The Indian Ocean Dipole होय. हा प्रभाव यावेळी हा प्रभाव सकारात्मक राहील आणि तो ला निनासोबत कार्यरत असेल, त्यामुळेही मान्सून चांगला राहणार आहे. दक्षिण, पश्चिम आणि वायव्य भारतात पाऊस गरजेपेक्षा जास्त राहील, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाऊस पुरेसा असणार आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये मात्र अपुरा पाऊस पडेल. तर ईशान्य भारतात मात्र पाऊस सर्वसाधारणपेक्षा अपुरा राहाणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT