Latest

पुणे : एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर छापा; 55 जणांवर कारवाई

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राजरोसपणे चालणार्‍या सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकून 55 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. यावेळी 4 लाख 55 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

सोमवारी (दि. 19) सायंकाळी सुमारास अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांना माहिती मिळाली होती. शिवाजीनगर परिसरातील महापालिका चौक जवळ सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकुण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली ऑनलाइन जुगार अड्डे सुरू होते. या जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारांवर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे आत लाईट सुरू असला, अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नव्हते.

जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेची माहिती समजल्यानंतर बनावट ग्राहकासह पोलीस पथकाने छापे टाकले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केली म्हणून ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे पथकही सहभागी झाले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT