पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रेंच शहरातील ॲनेसी येथील एका पार्कमध्ये माथेफिरुने चाकूने काही मुलांवर हल्ला केला. या घटनेत सहा मुलांसह सात जखमी झाले आहेत. यातील दोघा मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार,शहरातील तलावाजवळील उद्यानात गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता सुमारे तीन वर्षे वयोगटातील मुलांच्या गटावर चाकूने सशस्त्र एका व्यक्तीने हल्ला केल्याने ही घटना उघडकीस आली. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ही घटना अमानवीय असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न याही घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
स्थानिक आमदार अँटोनी आर्मंड यांनी ट्विट केले की खेळाच्या मैदानावर मुलांवर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्याला "घृणास्पद" म्हटले आहे. एका संशयिताला हल्ल्यानंतर ताबडतोब अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे, असे स्थानिक प्रीफेक्चरच्या प्रवक्त्याने सांगितले. संशयिन हा सीरियातील आहे. हल्लेखोराची ओळख पडताळली जात आहे आणि त्याची पुष्टी झालेली नाही.
हेही वाचा :