कोलकाता : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Singer KK) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. कोलकाता येथे एका कॉन्सर्ट झाल्यानंतर काही तासांनी गायक केके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर कोलकाता प्रेक्षागृहात सुमारे 10 तासांपूर्वी झालेल्या मैफिलीचे व्हिज्युअल पहायला मिळत आहेत.
53 वर्षीय गायक के. के. (Singer KK) कोलकात्याच्या नजरुल मंचाच्या सभागृहात कॉन्सर्टनंतर येथील एका हॉटेलमध्ये थांबले. त्या हॉटेलच्या पायऱ्यांवरून ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कृष्णकुमार कुन्नाथ (Singer KK) यांचे स्टेजचे नाव केके होते. त्याचे 'तडप तडप के इस दिल मे' या सारख्या अनेक गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. केके यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.