घाटकोपर ; पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गाची निर्मिती गेली बारा वर्षे रखडली आहे. या बाबत मुंबईमधील कोकणवासीय आक्रमक झाले आहेत. आज (रविवार) मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीमार्फत मुंबईमधील सर्व कोकणस्थ बांधव एकवटले.
मुंबईत ठीकठिकाणी या महामार्ग निर्मितीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. घाटकोपरच्या भटवाडी विभागात देखील ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला मोठा प्रतिसाद कोकणवासीयांनी दिला आहे. जर समृद्धी महामार्ग तात्काळ होतो तर मुंबई- गोवा महामार्ग का नाही? इथून पुढे हे आंदोलन तीव्र होईल, असा इशारा यावेळी कोकणवासीयांनी दिला आहे.
हेही वाचा :