Latest

कर्नाटक CM साठी चर्चेत असलेल्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांचं शिक्षण किती?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवत बहुमत मिळवले आहे. दरम्यान, आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत. या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. हे दोन्ही नेते कर्नाटकच्या राजकारणात वजनदार मानले जातात. या दोन नेत्यांबद्दल अधिक जाणून घेऊयात…

कर्नाटकचे दिग्गज नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या पूर्वी जेडीएसमध्ये होते. २००५ मध्ये माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आत्तापर्यंत एकूण ८ विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. यातील ४ वेळेस ते काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेस पक्षाने २०१३ मध्ये पहिल्यांदा सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, असे बोलले जात आहे.

शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले सिद्धरामय्या यांनी घेतलय वकिलीचे शिक्षण

सिद्धरामय्या यांचा जन्म म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामनहुंडी या गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिद्धरामय्या यांनी मोठा संघर्ष केला. वयोवर्ष १० पर्यंत त्यांचे कोणतेही शालेय शिक्षण झाले नव्हते. मात्र, त्यांनी बी.एससीची परिक्षा पास केली. यानंतर म्हैसूर विद्यापीठातून 'एल.एल.बी' चे शिक्षण घेतले. वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही वर्षे कायद्याचे शिक्षक म्हणून काम केले. आजवर त्यांनी वकिल ते कर्नाटकचे मुख्यमंत्री असा संघर्षमय प्रवास केला आहे.

डी. के. शिवकुमार यांनी घेतलंय पदव्युत्तर शिक्षण

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे डी. के. शिवकुमार यांचे. ते कनकपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आर अशोक यांचा पराभव केला. यापूर्वीही त्यांनी ३ वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. २००८, २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. डी. के. शिवकुमार यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याशिवाय ते प्रगतशील शेतकरी म्हणून देखील ओळखले जातात.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT