पुढारी ऑनलाईन
आगामी वेब सीरीजच्या एका प्रमोशन कार्यक्रमावेळी ब्राच्या साईजवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिने माफी जरी मागितली असली तरी तिच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. उलट त्या आणखी वाढली आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीला आता याच प्रकरणावरून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलीय. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका वकिलाने श्वेता आणि तिच्या वेब सीरीजच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, श्वेताच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
कायदेशीर नोटीस पाठवणारे वकिल जितेंद्र समाधिया म्हणाले, श्वेता तिवारीसह संपूर्ण स्टार कास्टना या वक्तव्यासाठी माफी मागायला हवी. आणि जर त्यांनी माफी नाही मागितली तर मी कोर्टात त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल करेन. जितेंद्र यांनी श्वेता शिवाय सौरभ राज जैन, दिंगगना सूर्यवंशी, कंगलजीत सिंह आणि रोहित रॉय यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
भोपाळ (मध्य प्रदेश) येथे तिने ब्रा साईज आणि देवाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तिथे ती आपल्या संपूर्ण टीमसह पत्रकार परिषदेत सहभागी झाली होती. यावेळी तिची जीभ घसरली. तिथे तिने प्रसारमाध्यमांसमोर 'मेरी ब्रा का साईज भगवान भी ले रहे है' असे वक्तव्य केले होते. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
तिच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आल्यानंतर तिने माफी मागितली होती. पण, भोपाळमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेताने माफीनामात म्हटलं की, त्याच्या वक्तव्याचा चुकीच्या पध्दतीने अर्थ लावण्यात आला. श्वेताने सांगितलं की, वेब सीरीजमध्ये तिचा को-स्टार सौरभ राज जैन तिच्या 'ब्रा फिटर' भूमिका साकारत आहेत. आणि सौरभने अनेक शो आणि मालिकांमध्ये भगवान कृष्णची भूमिका साकारली होती. यासाठी मी मजेत सौरभची चेष्टा केली होती.