शुभमन गिल-सारा अली खान  
Latest

Shubhman Gill- Sara : सचिनसमोर शतक ठोकल्यानंतर शुभमन गिल-साराचा ‘तो’ फोटो लीक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला. आणि २३ वर्षीय सलामीवीर शुभमन गिल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर शतक ठोकल्यानंतर शुभमन गिल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा 'तो' फोटो लीक झाला. शुभमन गिल क्रिकेटशिवाय आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी चर्चेत राहतो. आताही तो चर्चेत आलाय.

शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो आपल्या तथाकथित गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत आहे. शुभमन आणि साराचा हा फोटो एका युजरने शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो विमानतळावरील असल्याचं म्हटलं जात आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सारा – शुभमन एकत्र बसलेले आणि बातचीत करताना दिसत आहेत. याआधी शुभमन गिलचं नाव सोनम बाजवासोबत जोडलं गेलं होतं. पण, सोनमने स्पष्ट केलं आहे की, ती शुभमनला डेट करत नाही. सारा अली खानची क्रिकेटशी लिंक आहे. तिचे आजोबा आणि अभिनेत्री शर्मिला टागोरचे पती मंसूर अली खान पटौदी दिग्गज भारतीय क्रिकेटर होते.

गिल आता टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. गिलने 23 वर्ष 146 दिवस वय असताना ही लक्षवेधी कामगिरी केली आहे. तर त्यापूर्वी रैनाने 23 वर्ष 156 वय असताना टी-20 मध्ये शतक झळकावले होते. गिलचे शतक हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय फलंदाजांचे 13वे शतक ठरले आहे. या यादीत रोहित शर्मा (4), सुर्यकुमार यादव (3), केएल राहुल (2), विराट कोहली (1), दीपक हुडा (1), शुबमन गिल (1) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT