Nagin Dance : श्रेयस-रोहित-शार्दुलचा नागिन डान्स, ‘शहरी बाबू’ गाण्यावर थिरकले! 
Latest

Nagin Dance : श्रेयस-रोहित-शार्दुलचा नागिन डान्स, ‘शहरी बाबू’ गाण्यावर थिरकले! (Video)

रणजित गायकवाड

कानपूर : पुढारी ऑनलाईन : Nagin Dance : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोहित, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर 'कोई शहरी बाबू..' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, श्रेयस अय्यरने ग्रीन पार्क स्टेडियमवर पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक ठोकले आणि न्यूझीलंडविरुद्ध १०५ धावा केल्या. रोहित शर्मानेही श्रेयस अय्यरच्या या शानदार खेळीचे अभिनंदन केले. तसेच त्याने दुस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस आणि शार्दुलसह भन्नाट नृत्य करत आनंद साजरा केला.

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिला सुखद धक्का… (Nagin Dance)

रोहित शर्माने श्रेयस अय्यरचे कौतुक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. श्रेयसच्या शतकानंतर त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो अय्यर आणि शार्दुल ठाकूरसोबत 'कोई शहरी बाबू…' या गाण्यावर डान्स करत आहे. व्हिडिओसोबत कॅप्शन त्याने श्रेयसवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तीन क्रिकेटपटू हॉटेलच्या खोलीत नाग नृत्य करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तिन्ही खेळाडू एका बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. श्रेयस अय्यरच्या मागे उभे राहून, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेल्या डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत. डान्समध्येही तिघांनी मिळून जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.

क्रिकेटर्सच्या डान्सचा हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस पडत आहे. ही बातमी लिहिपर्यंत व्हिडिओला १,६४४,६५२ लाईक्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर लोकांनी यावर जबरदस्त आणि मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. आतापर्यंत १२ हजारांहून अधिक युजर्सनी पोस्टवर आपला अभिप्राय दिला आहे.

श्रेयस अय्यरचे शतक खास…

पदार्पणाच्या कसोटीत सामन्यात शतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा १६ वा भारतीय फलंदाज ठरला. गेल्या वेळी पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता. अय्यर व्यतिरिक्त एजी कृपाल आणि सुरिंदर अमरनाथ यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतके झळकावली होती.

न्यूझीलंडचे जोरदार प्रत्युत्तर…

कानपूर कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद १२९ अशी होती. किवी सलामीवीर विल यंगने ७५ आणि टॉम लॅथम ५० धावा करून भक्कम सलामी दिली. तत्पूर्वी, टीम इंडिया पहिल्या डावात ३४५ धावांवर ऑलआऊट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT