पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील टेक्सासमध्ये माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा ओक्लाहोमा राज्यातील टुल्सा शहरात आणखी एक गोळीबाराची घटना घडली आहे. येथील सेंट फ्रान्सिस हेल्थ सिस्टीम या रुग्णालयात बुधवारी एका हल्लेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
अमेरिकेतील गोळीबाराचे सत्र संपता संपेना झाले आहे. मागील आठवड्यात टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा बुधवारी टुल्सा शहरातील सेंट फ्रान्सिस हेल्थ सिस्टीम रूग्णालयात गोळीबार झाला.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्यानंतरही गोळीबार सुरूच असल्याने पोलिसांनी रुग्णांना दुसऱ्या मजल्यावर जाण्याचे निर्देश दिले. पोलिस उपप्रमुख जोनाथन ब्रूक्स यांनी दिलेल्या माहीतीनुसार गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये हल्लेखोराचादेखील मृत्यू झाला असून त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. गोळीबारानंतर बुधवारी दुपारी सेंट फ्रान्सिस हेल्थ सिस्टीमने परिसर बंद केला आहे.
हेही वाचलंत का ?