file photo  
Latest

धक्कादायक! दहशत निर्माण करण्यासाठी जामखेडमध्ये हवेत गोळीबार

अमृता चौगुले

पुढारी वृत्तसेवा :  किरकोळ भांडणातून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने १ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना जामखेड येथे घडली आहे. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश शाळा रोडवरील अक्सा मस्जिद परिसरात आपसातील भांडणातून हा प्रकार घडला.

सदरील गोळीबारातुन संबंधीताने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे . या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलीस स्टेशनला आद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

खासगी 400 शाळांच्या 'प्रतिपूर्ती'ला लावली कात्री; कोरोनात 60 टक्के कपात, संस्थाचालकांची ओरड
.
पोलीस प्रशासनाने अशा लोकांची झाडाझडती घेण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिक करत आहे. शहर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रे असल्यानेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. या गोळीबारानंतर पोलीसांनी शोध मोहीम हाती घेतली असल्याचे समजते. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT