Sanjay Shirsath  
Lok Sabha Election 2024

Sanjay Shirsath : छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढवणार : संजय शिरसाठ

अविनाश सुतार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोणी कितीही दावा करो, दावे प्रतिदावे होत असतात. पण छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढवणार आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी आज (दि.२४) येथे केला. ते माध्यमांशी बोलत होते. Sanjay Shirsath

ते पुढे म्हणाले की, मंगळवारी महायुतीची यादी जाहीर होणार आहे. यात अनेक चेहरे असे असतील की, यातूनच राज्यात राजकीय भूकंप होईल. सुरुवातीपासूनच भाजप संभाजीनगरवर दावा करत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दावे प्रतिदावे होत असतात. परंतु छतत्रपती संभाजीनगरची जागा आम्हीच लढवणार आहे. महायुतीच्या नियमानुसार त्या उमेदवारांच्या विजयासाठी युतीत असलेल्या पक्षांना काम करावेच लागणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. Sanjay Shirsath

Sanjay Shirsath महायुतीला बळ मिळाले

राज ठाकरे यांची महायुतीत एंट्री झाल्यामुळे मोठे बळ मिळाले आहे. आता राज्यात चार नेत्यांचा धमाका राहणार आहे.
कोणातही हिम्मत नाही

भाजपचे अनेक नेते 400 पार केल्यानंतर संविधान बदलू, असे वक्तव्य करत आहेत. याकडे लक्ष वेधले असता हे चुकीचे असून विरोधक समाजात चुकीचा संदेश पसरवत आहेत. कोणत्याही पक्षात संविधान बदलण्याची हिम्मत नसल्याचे यावेळी शिरसाठ यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे नुकसान

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना सतत डावलल्याने आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत. याचा मोठा फटका आघाडीलाच बसणार आहे. आंबेडकरांची ताकत काय आहे, हे त्यांना निवडणुकीत दिसून येईल, असेही शिरसाठ म्हणाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT