CM Eknath Shinde and Uddhav Thackeray 
Latest

Shiv Sena Symbol Row | दोन्ही गटांना सोमवार पर्यंत लेखी उत्तर देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश; ३० जानेवारीला सुनावणी

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पक्षाचे 'शिवसेना' हे नाव अन् 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोणाचे? या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगात आज शुक्रवारी (दि. २०) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दोन्ही गटांकडून चांगलीच खडाजंगी झाली. दोन्ही गटाच्या वकीलांनी आयोगासमोर बाजू ठेवली. दोन्ही बाजू ऐकूण घेत निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गट यांना सोमवार (२३ जानेवारी) पर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. तसेच या संबधीची पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी पार पडणार आहे. (Shiv Sena Symbol Row)

पक्षाचे 'शिवसेना' हे नाव अन् 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोणाचे? या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगात आज शुक्रवारी (दि. २०) महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर बाजू मांडली. (Shiv Sena Symbol Row)

दोन्ही गटाच्या वकिलांकडून बाजू ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. यांनतर आयोगाने दोन्ही गटाने सोमवार पर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच यासंदर्भातील पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी पार पडणार आहे. (Shiv Sena Symbol Row)

आजच्या सुनावणीवेळी आमच्याकडे बहुमत असल्याचा शिंदे गटाचा दावा ठाकरे गटाकडून खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अन्यथा निवडणूक घ्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यावेळी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची सिब्बल यांनी तुलना केली. शिंदे गटाची प्रतिज्ञापत्र तपासून पहा, अशी मागणी सिब्बल यांनी केली. दरम्यान, सिब्बल यांनी शिवसेनेची घटना निवडणूक आयोगासमोर सादर केली. सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून एक तासांहून अधिक वेळ युक्तिवाद केला. यावेळी पक्ष प्रमुख पदाला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.

शिंदे गट राजकीय पक्षच नाही

सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य आहे. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच आहे. शिंदे गट राजकीय पक्षच नाही. ठाकरे गटच खरी शिवसेना आहे. पक्षांबाबतच्या सर्व बाबींची पूर्तता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे, असा जोरदार युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

कामत आणि जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक

यावेळी युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद थांबवला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT