Latest

Shilpa Shetty चं ‘ब्रेक’अप! मोठा निर्णय घेत दिला चाहत्यांना झटका

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयानंतर चाहत्यांना झटका बसला आहे.

वास्तविक, शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे जो पूर्णपणे काळा आहे. हा फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, 'अशाच गोष्टींचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखेच दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.'

विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतरही तिने सोशल मीडियापासून फारकत घेतली नव्हती. त्या काळात ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असायची. दुसरीकडे राज कुंद्राने तुरुंगातून सुटताच आपले सोशल मीडियावरील अकौंट डिलीट केले.

शिल्पाने हा निर्णय अचानक कसा काय घेतला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्ट खूपच वैविध्यपूर्ण दिसतात. यात फिटनेस, योगासने, प्रेरणादायी संदेश, रविवारचा दिवस आणि निरोगीपणाशी संबंधित पोस्टचा समावेश आहे. शिल्पाचे जवळपास 25.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. पोस्ट्समध्ये शिल्पा शेट्टीच्या फॅशन चॉईस देखील पहायला मिळतात.

शिल्पा शेट्टी शेवटची 'हंगामा 2' मध्ये दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीशिवाय परेश रावल, राजपाल यादव, मीजन जाफरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता शिल्पा दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय शिल्पा रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT