shehnaaz gill - shehbaz badesha  
Latest

Shehnaaz Gill : शहनाजची पॉश कार, भावाला गिफ्ट केली चमचमती मर्सिडीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस-१३' फेम शहनाज गिल इंडस्ट्रीतील सर्वात दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. शहनाज आपल्या सॉफ्ट हार्ट नेचर आणि क्यूट जेस्चरसाठी ओळखली जाते. (Shehnaaz Gill) शहनाज आपल्या आई-वडिलांची लाडकी आणि भाऊ शहबाजची लाडली बहिण आगे. शहनाजने आपल्या भावाची लाखों किंमतीची कार गिफ्ट केलीय. यातून दिसते की, दोघांमध्ये किती प्रेम आहे. शहनाज कौर गिलने आपला भाऊ शहबाजला एक नवी मर्सिडीज गिफ्ट दिलीय. (Shehnaaz Gill)

शहनाजचा भाऊ गायक आणि यूट्यूबर शहबाज बदेशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने लिहिलंय, 'नव्या गाडीसाठी थँक्यू बहिण शहनाज गिल.' शहबाजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये नव्या कारची सुंदर झलक दिसत आहे. हे पाहून शहनाजच्या फॉलोअर्सना खूप आनंद झाला आहे. व्हिडिओमध्ये शहबाजला शोरूममध्ये आपली नवी मर्सिडीज-बेंज ई-क्लासचे वेलकम करताना दिसत आहे.

शहनाजने भावाला गिफ्ट केली कार

शहबाजने आपली पॉश न्यू कारशी मॅचिंग कपडे परिधान केले आहेत. त्याशिवाय, टेस्टी चॉकलेट केकने सजलेला एक टेबलदेखील दिसला. केकवर लिहिलंय, 'अभिनंदन.' मार्केट रेटनुसार, शहबाजची नवी कार मर्सिडीज-बेंज ई-क्लासची किंमत ७४.९५ लाख ते ८८.८६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT