Share Market Today : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज सोमवारी (दि.१२) शेअर बाजारात घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला. तर निफ्टी १८,४०० च्या खाली आला होता. एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर्स अधिक घसरले. त्यानंतर सकाळी १० नंतर दोन्ही निर्देशांक सावरले. त्यानंतर सेन्सेक्स ५१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ६२,१३० वर बंद झाला. तर निफ्टी १८,४९७ वर बंद झाला. एलआयसीचे शेअर ४ टक्क्यांनी वाढले. तर इन्फोसिस, टायटनचा शेअर १ टक्क्यांनी घसरला.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि इतर प्रमुख बँकांच्या दरवाढीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांक घसरले आहेत. तसेच आशियाई बाजारातही सुरुवातीच्या व्यवहारात घसरण पहायला मिळाली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.२३ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.५९ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.२४ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.४३ टक्क्यांनी खाली आला आहे.
फेडरल रिझर्व्हकडून ५० बेस पॉइंट्स (bps) व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड देखील व्याजदर वाढीची घोषणा करणार आहेत. याची गुंतवणूकदारांना धास्ती लागली आहे.
हे ही वाचा :