प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

सेन्सेक्स १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ वर बंद, गुंतवणूकदारांना २.३६ लाख कोटींचा फटका

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन

सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी खुल्या झालेल्या शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड पहायला मिळाली. सेन्सेक्स (BSE Sensex) तब्बल १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (NSE Nifty) ३०२ अंकांनी खाली येऊन १७,१७३ वर बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार गडगडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सेन्सेक्सच्या घसरणीत HDFC Bank आणि Infosys या दोन कंपन्यांच्या स्टॉक्सचे प्रमाण सुमारे ५०० अंकांहून अधिक होते. Infosys च्या तिमाही उलाढालीतून झालेली निराशा आणि प्रतिकूल जागतिक संकेतांचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले. यामुळे गुंतवणूदारांना सुमारे २.३६ लाख कोटींचा फटका बसला.

शेअर बाजारातील ट्रेडिंगच्या ६० मिनिटांच्या आत, बीएसईवर सूचीबद्ध सर्व समभागांचे बाजार भांडवल गेल्या बुधवारच्या २७२.०३ लाख कोटींवरून २६९.५९ लाख कोटींपर्यंत घसरले. विशेष म्हणजे, मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्सची तुलनेने कामगिरी समाधानकारक राहिली. त्यांचे नुकसान १.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिले.

इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. Infosys, या भारतातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ७४४.०५ डॉलर दशलक्ष ए‍ढा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. पण मार्च महिन्यातील नफ्याच्या तुलनेत हा नफा कमी आहे.

एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या उलाढालीचे तिमाही आकडे बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी राहिले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या. याच पडसाद आज शेअर बाजारात दिसून आल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, टाटा स्टीलचे शेअर्स आज बाजारात अधिक व्यवहार करत होते. आज सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा स्टीलचे शेअर्स आणखी २.३१ टक्क्यांनी वाढून १,३४९ रुपयांवर पोहोचले. टाटाचे शेअर्स तीन सत्रांच्या घसरणीनंतर वधारले आहेत.

चीनमध्ये कोरोनाचे संकट आहे. यामुळे मार्च तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीचा आकडा ४.८ टक्क्यांवर आला. यामुळे आशियाई बाजारपेठांमध्ये कमकुवत स्थिती राहिली. चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT