पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातील संमिश्र परिणामाचे पडसाद आजही देशांतर्गत शेअर बाजारावर पाहायला मिळाले. बुधवारी निफ्टी ५० हा निर्देशांक १९,४४३.५० वर बंद झाला तर सेन्सेक्स ६४,९६५.२९ वर बंद झाला. निफ्टी ५० मध्ये ३६.८० अंकाची तर सेन्सेक्समध्ये २२.८९ अंकाची वाढ झाली आहे.
आज सलग दुसर्या दिवशी शेअर बाजाराची प्रारंभी व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली. Nifty 50 हा इंडेक्स सकाळी ०.२२ टक्केंनी वधारत १९,४४९.६०ने सुरू झाला, तर बीएसई सेनसेक्स १५९.५५ ने वधारत ६५.१०१.९५ ला सुरू झाला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, झोमॅटो, प्रिन्स पाईप्स आणि अपोलो टायर्स हे NSE वर सर्वाधिक सक्रिय स्टॉक ठरले. BPCL, Asian Paints, Dr Reddy's Labs, Cipla आणि Adani Ports हे बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात NSE निफ्टी 50 वर सर्वाधिक लाभधारक ठरले. तर मंगळवारी लिस्ट झालेल्या MamaEarthच्या Honasa Consumersने मात्र निराशा केली.
Financial Express ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गुंतवणुकदारांचे आता लक्ष अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरॉम पॉवेल यांच्या भाषणाकडे असेल. फेडरल रिझर्व्हच्या तज्ज्ञांनी व्याजदर आणखी वाढण्यासाठी जागा असल्याचे म्हटले आहे, त्यानंतर डॉलर बुधवारी पुन्हा वधारला होता.
आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत अल्केम लॅब या कंपनीने ६१४.८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरने आज चांगली कामगिरी केली. या कंपनीचा शेअरच्या किंमतीत आज ४.७६ टक्के इतकी वाढ झाल्याने हा शेअर ४,२१९ रुपयांवर जाऊन पोहोचला होता.
अल्केम लॅबच्या बरोबरीचने बुधवारी हिंदूस्थान पेट्रोलियम, अपोलो टायर्स, झायडस लाईफसायन्स, जेनस पॉवर इन्फ्रा, बीपीसीएल, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डी, सिप्ला, आदानी पोर्ट या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली.
MamaEarth या नावाने कॉस्मेटिक्सची विक्री करणाऱ्या Honasa Consumersचा शेअर आयपीओनंतर काल शेअर बाजारावर लिस्ट झाला. पण लिस्टिंग आणि इश्यू प्राईस यात फार काही फरक पडलेला नाही. इश्यू प्राईस ३२४ रुपये असलेला हा शेअर NSEवर ३३० रुपयांना आणि BSE वर ३२४ रुपयांना लिस्ट झाला होता. MamaEarthचा IPO आल्यानंतर इन्स्टिट्यूशनल बिडर्समुळे हा शेअर ११.५ पट ओव्हर सबस्क्राईब झाला होता. पण रिटेल गुंतवणुकदारांसाठी जो कोटा राखीव होता, त्यात हा शेअर फक्त १.४ पट ओव्हरसबस्क्राईब झाला होता.
MamaEarth नंतर फ्युचर कंझ्युमर्स, मिश्रधातू निगम, सुप्रिया लाईफ सायन्स, रेन इंडस्ट्रीज, फ्युचर रिटेल या कंपन्यांनी खराब कामगिरी केली.
हेही वाचा