Latest

छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात

गणेश सोनवणे

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा येवला तालुक्यात आठ जुलैला घेण्याचे ठरवले असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ही सभा नियोजित आहे.

येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांच्या निरोपावरून बुधवारी सकाळी मुंबईत भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी येवला येथून महाराष्ट्रातील सभेला सुरुवात करण्याचे ठरवले. ॲड. शिंदे यांना भुजबळांमुळे पक्षातून बाहेर ठेवले गेले होते. राष्ट्रवादीतून बाहेर काढल्यावरही शिंदे इतर कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्याकडून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

भुजबळांसाठी येवल्यातील पहिली सभा येवला बाजार समितीच्या आवारात शरद पवार यांनी घेतली होती, भुजबळांच्या राजकीय पुनर्वसनासाठीची ही पहिलीच सभा येवल्यात झाली होती. आता त्यात भुजबळांविरुद्ध शरद पवार त्याच ठिकाणी सभा घेत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT