Latest

Shahbad Dairy Murder case : दिल्लीतील साक्षी खून प्रकरणातील आरोपी साहिल खान याच्यावर ६४० पानी आरोपपत्र दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दिल्लीत १६ वर्षीय तरुणीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेसह दिल्लीसह देश हादरला होता. दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात लोकांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर साहिल खान या तरूणाने त्याची अल्पवयीन मैत्रीण साक्षीचा निर्घृणपणे भोसकून खून केला. याप्रकरणी संशयित आरोपी साहिल याच्याविरूद्ध आज न्यायालयात (दि.२८ जून) ६४० पानांचे आरोपपत्र (Shahbad Dairy Murder case) न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

Shahbad Dairy Murder case: काय आहे साक्षी खून प्रकरण?

साहिल सर्फराज खान आणि साक्षी जून 2021 पासून मित्र होते. साहिलच्या प्रोफाईलवर त्याचे फोटो मनगटावर भगवा गंडा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह आहेत. नंतर साक्षी साहिलला टाळू लागली. ती दुसर्‍याच्या प्रेमात पडल्याचा संशय साहिलला येऊ लागला. काही दिवसांपूर्वीच त्याने साक्षीला ठार मारण्याची धमकी दिली होती. साक्षीने तिच्याकडून साहिलसोबत ब्रेकअप केला होता; पण साहिल तिचा पीछा सोडत नव्हता. दोघांमध्ये वाद झाला अन् साहिलने साक्षीला संपविले.

20 वार, चाकू डोक्यात फसला, म्हणून मग दगडाने 6 वेळा ठेचले

साक्षीच्या हत्येचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला क्षण सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. साहिलने साक्षीवर चाकूने 20 वार केले. शेवटचा वार करताना चाकू साक्षीच्या डोक्यात अडकला. तेव्हा बाजूला पडलेला भला मोठा दगड उचलून त्याने 6 वेळा साक्षीला ठेचले. एवढे क्रौर्य कोठून येते, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. साहिलचे हुक्का पित असतानाचे रिलही आहेत. साहिलला दारूचेही व्यसन आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT