नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये इयत्ता 11वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या भावावर आणि वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. मुलीने तिच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिल्यावर सदरची गंभीर बाब उघडकीस आली. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुलीची माहिती कळताच धक्का बसला आणि त्यांनी तातडीने तिला पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. (Sexual Assault)
विद्यार्थिनीने तिच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितले की, तिचे वडील आणि भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सोबतच कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या बाबतची माहिती देऊन पोलिसांनी सांगितले की, पीडितेची सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर खेरकी दौला पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये एफआयआर नोंदवण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वस्तुस्थिती पडताळून पाहत असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. (Sexual Assault)
घरांमध्ये लैंगिक छळाचे गुन्हे सर्रास घडत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, मुंबईतील एका विशेष न्यायालयाने आपल्या १३ वर्षांच्या मुलीला दोन वर्षांसाठी बांधून, मारहाण आणि बलात्कार केल्याबद्दल पीडितेच्या पित्याला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, अरोपी हा पीडितेचा पालक व संरक्षक आहे आणि त्यानेच असे घृणास्पद कृत्य केल्याने हा गंभीर अपराध आहे. ५३ वर्षाच्या आरोपी पित्याने माझीयययययययय पत्नी आणि ४ मुले असून त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे मला शिक्षेत सुट द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. परंतु, तुने दिलेला तर्क कितीही बरोबर असला तरी तो परिस्थिती बदलू शकत नाही. कारण, आरोपीने केलेला अपराध दबावातून अथवा अल्पवयीन पीडितेच्या उकसवण्यामुळे करण्यात आला नव्हता.
अधिक वाचा :