पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ईडीचे (अंमलबजावणी संचालनालया) समन्स वगळल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरुद्धच्या कारवाईला स्थगिती देण्यास दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.१५) नकार दिला. Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीसाठी तब्बल आठवेळा समन्स पाठवले होते. परंतु केजरीवाल यांनी सरकारवर टीका करत, मला अटक करून दिल्लीचे सरकार पाडण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप केला होता. तसेच यामधील एकाही समन्सवर ते ईडीच्या चौकशीस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे केजरीवाल यांच्या विरोधात समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी बुधवारी ईडीने केजरीवाल यांच्या विरोधात न्यायालयात दुसऱ्यांदा धाव घेतली. Arvind Kejriwal
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांना ईडीने आठवेळा समन्स बजावले होते. परंतु ते एकदा देखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने दिल्ली सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स बजावले होते. याविरूद्ध केजरीवाल यांनी ईडीचा त्यांच्यावरील खटला थांबवण्याची मागणी करणारी याचिका राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे.
हेही वाचा