Latest

Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचच्या छातीवर ‘सिक्रेट चिप’

Shambhuraj Pachindre

पॅरिस; वृत्तसंस्था : टेनिस इतिहासातील सर्वोत्तम पुरुष टेनिसपटूंपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच सध्या फ्रेंच ओपन खेळत आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात जोकोविचचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात जोकोविचच्या छातीवर एक चिप लावलेली दिसत आहे. (Novak Djokovic)

ही चिप काय आहे? याबाबत सर्वजण चर्चा करत आहेत. जोकोविचने या चिपबाबत खुलासा केला की, तो त्याची खेळातील क्षमता वाढवण्यासाठी अद्भुत आणि परिणामकारक नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. ज्या इटालियन कंपनीने या चिपची निर्मिती केली आहे त्यांनीदेखील असाच दावा केला आहे. (Novak Djokovic)

जोकोविचच्या टीमनेदेखील सामन्यादरम्यान ही चिप बदलली होती. चिप बॉल गर्लमार्फत जोकोविचपर्यंत पोहोचवण्यात आली. दरम्यान, समालोचक ऑन एअर म्हणाला की, 'नोव्हाकला काही तरी चिकटवण्यात आले आहे. मला वाटते की, नोव्हाक हा आयर्न मॅन आहे.'

सामन्यानंतर नोव्हाक म्हणाला की, माझ्या टीमने मला अत्यंत उपयुक्त अशी नॅनोटेक्नॉलॉजी दिली आहे. यामुळे माझी टेनिस कोर्टवरील कामगिरी सुधारण्यास मदत होत आहे. हे माझ्या यशस्वी कारकिर्दीचे मोठे रहस्य आहे. ही चिप नसती तर मी इथे बसलोच नसतो.'

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT