Vivek Bindra 
Latest

Vivek Bindra : मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांची दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाण, कानाचा पडदा फाटला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क -प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांनी रागाच्या भरात आपल्या दुसऱ्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे. आता विवेक ब्रिंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Vivek Bindra) ही तक्रार त्यांची दुसरी पत्नी यानिका यांच्या भावाने दिली आहे. यानिका यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्रा यांनी पत्नी यानिकाला खोलीत बंद करून मारहाण केली. तिचे केस ओढले. शिवाय बेदम मारहाणीत तिचा कानाचा पडदा फाटला आहे. चेहऱ्यालाही गंभीर दुखापक झाली आहे. (Vivek Bindra)

संबंधित बातम्या –

तक्रारीत म्हटलंय, विवेक यांनी यानिकाचे केस ओढले. तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली. मोबाईल फोडला. यानिकाच्या भावाने विवेक बिंद्राविरोधात नोएडा येथे गुन्हा दाखल केला आहे. ६ डिसेंबरला विवेक बिंद्रा यांचं यानिकासोबत लग्न झालं होतं. त्यानंतर ८ डिसेंबरला विवेक बिंद्रा यांनी तिला मारहाण केली. १४ डिसेंबर रोजी यानिका यांच्या भावाने बिंद्रांविरोधात पोलिसात तक्रार दिली.

वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

विवेक बिंद्रा आपली पत्नी यानिकाशी वाद घालतानाचा व्हिडिओ समोर आला असून ते सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालताना दिसत आहेत.

कोण आहेत विवेक बिंद्रा?

विवेक बिंद्रा यांच्या कंपनीचे नाव बडा बिझनेस अशे आहेत. ते या कंपनीचे सीईओ असून ते प्रसिद्ध यु-ट्यूबरदेखील आहेत. या कंपनीत लोकांना इंटरप्रेन्योरशिप आणि व्यवसायिक ट्रेनिंग आणि सल्ले दिले जातात. कंपनीचा टर्नओव्हर ५० कोटी इतका असल्याचे सांगितले जाते.

नेमकं काय घडलं?

लग्नाच्या दोन दिवसांनी ८ डिसेंबरला सकाळी ३ वाजता विवेक त्यांच्या आईसोबत वाद घालत होते. तेव्हा यानिका तिथे पोहोचल्या. तिथे यानिकाने आई-मुलाचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु विवेक बिंद्रा हे संतापून रागाच्या भरात पत्नीला खोलीत बंद केले आणि बेदम मारहाण केली, असा आरोप यानिका यांच्या भावाने तक्रारीत म्हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT